सिद्धेश परब;शिरोड्यातील बीएसएल प्रश्नावरून इशारा…
वेंगुर्ले ता.०९: तालुक्यातील शिरोडा दशक्रोशीत गेले महिनाभर बीएसएनएलचे नेटवर्क बंद आहे.येत्या २ दिवसात सदर यंत्रणा सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट रोजी दशक्रोशीत ज्या-ज्या ठिकाणी टॉवर आहेत,त्या टॉवरवर चढून उपोषण करण्यात येईल,असा इशारा काँग्रेसचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष तथा वेंगुर्ले प.स.सदस्य सिद्धेश परब यांनी भारत संचार निगम वेंगुर्ले विभागीय अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
शिरोडा परिसरात सध्या बीएसएनएलचे नेटवर्क मिळणे दुरापास्त झाले आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यावर टॉवर तात्काळ बंद होऊन नेटवर्क जात असते.त्यामुळे दशक्रोशीतील ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या टॉवर मध्ये जनरेटरची व्यवस्था नसल्यामुळे नेटवर्क बंद होते.तरी या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, येत्या २ दिवसात सदर यंत्रणा सुरळीत न केल्यास १५ ऑगस्ट रोजी दशक्रोशीत ज्या ज्या ठिकाणी टॉवर आहेत त्या टॉवरवर बसून
दशक्रोशितील जनतेचा सहभाग घेत युवक काँग्रेस उपषण करणार व होणाऱ्या परिणामांना आपणच जबाबदार असाल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.