Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअसनिये-घारपी रस्त्यासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव...

असनिये-घारपी रस्त्यासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव…

खासदार विनायक राऊत यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश…

ओटवणे ता.०९:  ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून,असनिये-घारपी साठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश ,खा.विनायक राऊत यांनी शुक्रवारी दिले.खा.राऊत यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह असनिये-घारपी मार्गावर कोसळलेल्या दरडीची शुक्रवारी पाहणी केली.येथे पडलेली दरड योग्य पद्धतीने हटवून,दरडींमुळे स्थलांतर केलेल्या कणेवाडी येथील ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही खा.राऊत यांनी दिले.
असनिये येथे दरड कोसळून घारपी येथे जाणार रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.त्याचप्रमाणे सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे कणेवाडीस धोका निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर स्थितीची पाहणी करण्यासाठी खा.विनायक राऊत यांनी शुक्रवारी उशिरा असनियेस भेट दिली.यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे,जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी,जि. प.सदस्य नागेंद्र परब,मायकल डिसूझा, सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पडते,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,बाबुराव धुरी,अशोक दळवी,तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खा.राऊत यांनी दरडींमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत ग्रामस्थांशी तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली.असनिये घारपीला जोडणारा एकच मार्ग आहे.तो आता दरडीमुळे बंद झाला आहे.जोपर्यंत दरड हटवून मार्ग खुला होत नाही तोपर्यंत पर्यायी मार्गाची व्यवस्था केली जावी,रस्ता व एस. टी सेवा नसल्याने असनिये,बांदा,सावंतवाडी येथे शिक्षणासाठी जाणारी 40च्या वर मुले अडकून पडली आहेत,रस्ता नसल्याने ग्रामस्थांना वैद्यकीय आदी सुविधा मिळत नाही तसेच कणेवाडी येथील स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांच्या सुविधांचा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून,असनिये-घारपी साठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्याचे तसेच येथे पडलेली दरड योग्य पद्धतीने हटवून,दरडींमुळे स्थलांतर केलेल्या कणेवाडी येथील ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश खा.राऊत यांनी दिले.दरम्यान, रस्त्यामुळे शाळेत न जाऊ शकणाऱ्या शालेय मुलांबाबत योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान, खा.राऊत यांनी झोळंबे दापटेवाडी येथे डोंगर खचून माती घरात व बागायतीत घुसून नुकसान झालेल्या परिसराचीही पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments