वेंगुर्ले-तुळस गावातील पूरग्रस्तांची निलेश राणेंनी घेतली भेट…

674
2

वेंगुर्ले ता.०९: तालुक्यातील स्थलांतरीत तुळस पलतड परबवाडी येथील ग्रामस्थांना माजी खासदार नीलेश राणे यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी भावूक होत प्रशासनच्या विरोधात कैफियत मांडली.यावेळी श्री.राणे यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत त्यांना तात्काळ लागणारे जेवणाचे साहित्य पक्षाच्या माध्यमातून पुरविले आणि सोबत असल्याचा विश्वास देखिल दिला.
तुळस येथील डोंगर कोसळल्याने तेथील ३२ कुटुंबियांना प्रशासनाने सुरक्षिततेसाठी गावातील शाळेत स्टालांतरीत केले आहे. हि माहिती मिळताच आज स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस मा.खासदार निलेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या स्टालांतरीत ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी तेथील महिला भावुक झाल्या. त्यांनी निलेश राणे समोर आपल्या संवसाराची कैफियत मांडली. सरस्वती शाळेत स्थलांतरीत झालेल्या या ग्रामस्थांकडे अद्याप स्थानिक आमदार,खासदार यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.
दरम्यान आज रात्री जेवणाची सोय करण्याचे राणे यांनी या ग्रामस्थांना आश्वासन देऊन तात्काळ पक्षामार्फत धान्य पुरविले. तसेच ग्रामस्थांची पर्यायी रस्त्याची मागणी केली. यावेळी स्वाभिमान तालुकाध्यक्ष दादा कुबल यांना जमीन मालकाशी बोलणं करून घ्या ताबोडतोब ठेकेदार पाठवून रस्ता करून देतो असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तालुकाध्यक्ष दादा कुबल, सरपंच शंकर घारे, पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सारिका काळसेकर, परबवाडा सरपंच पप्पू परब, विभागीय अध्यक्ष नितीन चव्हाण, नगरसेविका शीतल आंगचेकर, मारुती दोडणशेट्टी, सायमन आलमेडा, प्रार्थना हळदणकर, मनवेल फर्नांडिस, आशु फर्नाडिस, शिवप्रसाद घारे, पिंट्या राऊळ, जयवंत तुळसकर, शेखर तुळसकर, भाग्यलक्ष्मी घारे आदिंसह पलतड ग्रामस्थ उपस्थित होते.

4