आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार… ग्रामसेवकांनी धरणे आंदोलना दरम्यान दिला इशारा : उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर…

147
2

मालवण, ता. ९ : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या मालवण शाखेच्यावतीने तालुक्यातील ग्रामसेवकांनी आज येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. ग्रामसेवकांवर अन्याय झाला असल्याचे माहित असतानाही शासनाकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठीच हे आंदोलन छेडण्यात आले आहे. २२ ऑगस्टपूर्वी या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना सादर करण्यात आले.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून विकास अधिकारी हे पद अस्तित्वात आणावे, कृषी सहायक व ग्रामसेवक यांचे काम समान असताना शासनाने आम्हाला सापत्नीक वागणूक दिली आहे. सहाव्या, सातव्या वेतन आयोगानुसार मोठी तफावत असल्याने वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. प्रवासभत्ता ११०० वरून १५०० रुपये करावा यासह अन्य मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले.
या धरणे आंदोलनात ग्रामविकास अधिकारी संतोष गावडे, युवराज चव्हाण, सागर देसाई, पी. टी. पेडणेकर, युगल प्रभूगावकर, अंबादास पेठे, सुनील चव्हाण, अशोक पाटील, कृष्णा दळवी, गणेश नलावडे, सुनील प्रभुदेसाई, आर. आर. वनकर, डी. व्ही. कांबळे, एच. बी. तांबे, बी. एस. बालम, व्ही. व्ही. रावले, अशोक गर्कळ, पी. जी. कदम, महेंद्र मगम, ए. जी. जोशी, एस. पी. कोळसुलकर, प्रकाश सुतार, टी. वाय. झोरे, एस. के. कांबळे, भगवान जाधव, एम. एम. कुणकवळेकर, चंपू रावले, एम. एस. पिळणकर, युती चव्हाण, माधुरी कामतेकर, चंदा सडविलकर, एस. पी. परब आदी उपस्थित होते.
शासनाचे अधिकारीही ग्रामसेवकांवर अन्याय झाला हे मान्य करत आहेत. आमच्या मागण्यांकडे शासनाकडून डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे शासनाला जाग आणावी यासाठी हे उपोषण केले जात आहे. २२ ऑगस्टपूर्वी मागण्या मान्य झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. आज नाही तर कधीच नाही यातून हे आंदोलन येत्या काळात ताणले गेल्यास त्याचा परिणाम गावागावातील विकासकामांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

4