कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सावंतवाडीतील युवकांचा पुढाकार…

2

सावंतवाडी ता.०९: कोल्हापूर येथील पुर परिस्थिती लक्षात घेता सावंतवाडीतील युवकांनी जिल्हावासीयांच्या मदतीने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.यात लोकांच्या पुढाकारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांकडून मदतीचा हात अपेक्षित आहे.
यात जुने कपडे, टॉवेल रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, ओडोमोस क्रीम, औषधे आदी वस्तू जमा करून संबंधितांना वाटप करण्यात येणार आहे.ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना अथवा दानशूर व्यक्तीना अशा प्रकारच्या वस्तू द्यायच्या असतील त्यांनी खालील नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन मिलिंद देसाई यांनी केले आहे.
संबंधित पूरग्रस्तांना ही मदत लवकरात लवकर देण्यात येणार आहे.तत्पूर्वी जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून देण्यात येणारी मदत टेम्पो अथवा ट्रक च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी 8888925580 या नंबर वर संपर्क साधावा.

22

4