जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन कोटीची मदत

2

मुख्यमंत्री सहायता निधी:पालकमंत्री, आमदार,खासदारांच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्गनगरी ता.०९: जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून दोन कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.ही मदत उद्यापासून संबंधित पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिली.
जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेता लोकांना नुकसानतून बाहेर काढण्यात यावे यासाठी पालकमंत्री केसरकर यांच्यासह खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.दरम्यान जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे.उद्यापासून तातडीने ही मदत लोकांना वाटप करण्यात येणार आहे.जिल्ह्यात गेले पाच दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.त्यात अनेक लोकांच्या घरात पाणी घुसले,अनेकांना स्थलांतर करावे लागेल या सर्व गोष्टी लक्षात घेता लोकांना मदतीची गरज आहे.त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबाला पंधरा हजार व ग्रामीण भागातील कुटुंबाला दहा हजार,अशी रक्कम देण्यात येणार आहे असे श्री.केसरकर यांनी सांगितले.

0

4