सावंतवाडी शहरातील एका पेट्रोल पंप वरील इंधन पुरवठा सुरळीत…

158
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पेट्रोल-डिझेलसाठी तब्बल ४० ते ५० मीटर अंतरावर वाहनांची रांग…

सावंतवाडी ता.१०: शहरातील एका पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा आज सुरळीत झाला असून याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.तर पेट्रोल-डिझेलसाठी तब्बल चाळीस ते पन्नास मीटर अंतरावर वाहनांची रांग लागली आहे.मात्र इंधन मिळताच वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
गेले काही दिवस ढग फुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिक-ठिकाणी वाहतूक बंद झाली होती.त्यामुळे याठिकाणी इंधन पुरवठा करणारे टँकर यात अडकले होते.गेले दोन दिवस शहरात वाहन धारकांना पेट्रोल-डिझेलचा तुटवडा सहन करावा लागला होता.मात्र काल रात्री शहरातील एका पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा सुरू होताच आज त्याठिकाणी वाहनांनी मोठी गर्दी केली.

\