पूरग्रस्तांचा मदत निधी बँक खात्यात जमा होणार…

178
2
Google search engine
Google search engine
Google search engine

रोख रक्कम मिळणार नाही; सरकारचा निर्णय…

मुंबई,ता.१० : पूरग्रस्तांना दिला जाणारा मदत निधी पीडितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सदर आदेश दिले असून अशा स्थितीमध्ये पीडितांना बँकांच्या वाऱ्या करायला लावणे योग्य नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
सरकारद्वारे पूरग्रस्तांसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून वर्ग करण्यात आला आहे.हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.हा निधी संबंधितांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्याचे निर्देश या आदेशात दिले आहेत.यावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. आपत्तीत आजवर शासकीय मदत ही रोख दिली गेली. पण आता शासनाने मदत बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.लोकांचे संसार उद्धवस्त झाले असताना बँकेच्या वाऱ्या करायला लावणं योग्य नाही. शनिवार/रविवारी बँका बंद असतात.अथवा बँक व्यवस्थापन लोकांपर्यंत पोहचवा ही विनंती,असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
काल शासनाच्या पुरामध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक काळ क्षेत्र पाण्याखाली असल्यास मदत मिळणार असल्याच्या जीआरवरून सरकारवर जोरदार टीका झाली आहे.यातच हा जीआर आल्याने पुन्हा सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कोणत्याही परिस्थितीत रोख रकमेने निधी न देण्याचे देखील या आदेशात म्हटले आहे.पूरग्रस्त क्षेत्रात वीज नसल्याने तांत्रिक अडचणी आहेत.तसेच बँका, एटीएम देखील बंद असल्याने खात्यावरील पैसे पीडितांना कसे मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

\