फोंडाघाट महाविद्यालयाचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन…

2

फोंडाघाट ता.१०: महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने हाहाकार उडालेला असून कोल्हापूर,सांगली या दोन जिल्ह्यातील लोकांना महापुराचा तडाखा बसला आहे.या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून कित्येक लोक बेघर झालेल्या आहेत.शिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला असून बरेच लोक पुराच्या पाण्यात अडकून पडलेली आहेत अशा सर्व संबंधितांना मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठाने केले असून फोंडाघाट महाविद्यालय त्यासाठी पुढे आलेले आहे.
महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करणार असून अन्नधान्य बरोबर कपडे, बेडशीट, ब्लँकेट, स्वेटर, टीशर्ट, शॉर्ट – पॅन्ट, साड्या, ORS पाकिटे, प्रथमोपचाराचे साहित्य इत्यादी आवश्यक साहित्य पूरग्रस्तांना मदत म्हणून स्वीकारले जाणार आहे. तरी मानवतेच्या भावनेतून संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी 9421237365 व 7507471515 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे आणि प्राचार्य डॉ. वसंत शेकडे यांनी केले आहे.

14

4