आडेली ग्रा.प. उपसरपंच पदी शिवसेनेच्या प्राजक्ता मुंडये बिनविरोध

209
2

वेंगुर्ले : ता.१०: तालुक्यातीक आडेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या सौ. प्राजक्ता प्रशांत मुंडये यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आडेली ग्रामपंचायत उपसरपंच सौ. मनाली धुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ. प्राजक्ता प्रशांत मुंडये यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान ‌सौ. प्राजक्ता मुंडये यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आडेलीतील शिवसेना ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून गावाच्या विकासासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

4