कुडाळ, ता.१० : गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने गेले सात ते आठ दिवस धोक्याची पातळी ओलांडली होती. आज पुलावरील पाणी ओसरल्यावर ग्रामस्थांनी पुलाची पाहणी केली असता मोठी भगदाड पडलेले निदर्शनास आले.याबाबतची माहिती कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास अधिकारी पुलाच्या ठिकाणी दाखल झाले. ग्रामस्थांनी त्यांना विचारले असता समर्पक अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळाली नाही. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला.तसेच कालांतराने हे पूल वाहून जर गेले तर २७ गावांचा संपर्क तुटला जावू शकतो. तसेच माणगाव हायस्कूल मध्ये जाणाऱ्या मुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे .काही दिवसातच गणेश चतुर्थीसाठी येणारे चाकरमाने त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची परिस्थिती निर्माण होवू शकते.
प्रशासनाने त्वरित या पुलाची डागडुजी करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांकडून इशारा देण्यात आला आहे .