नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे आयोजन…
मालवण ता.१०: तालुक्यात नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून बुधवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:०० वाजता मालवणी संस्कृती व वारसा मंडळ यांच्यावतीने महिलांसाठी खुल्या नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सहभागी स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्रातून दिली.
या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी सोन्याची नथनी आणि पैठणी,तर उत्तेजनार्थ स्पर्धकाला चांदीची पैजण देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना व स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांना लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे