तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला “दोडामार्ग आधार ग्रुप’ धावला…

2

समाजातील दानशूरांना केले मदतीचे आवाहन…

दोडामार्ग ता.१०: तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शहराला पुराचा फार मोठा फटका बसला आहे.त्यामुळे अनेक कुटुंबांचा संसारच उघड्यावर पडला आहे.शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण तो पर्यत बेघर झालेल्यांनी करायचे काय? असा सवाल दोडामार्ग आधार ग्रुप दोडामार्ग यांनी आज येथे केला.
यावेळी “दोडामार्ग आधार गृप दोडामार्ग” पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.कोनाळकट्टा,लोंढेवाडी,वांयगणतड या ठिकाणी या गृपच्या माध्यमातून स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यात आला आहे.तसेच इतर कुटुंबांसाठी दानशूर व्यक्तींनीही पुढे यावे,असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी “दोडामार्ग आधार गृप दोडामार्ग” ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

0

4