असनियेतील “त्या” धोकादायक दरडी हटविण्याचे काम सुरू…

2

१८ कुटूबांचे शाळेत स्थलांतर:शाळकरी मुलासह रुग्णांचे हाल…

ओटवणे.ता,१०: असनिये-घारपी मार्गावर कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम शनिवारपासून हाती घेण्यात आले.दरडींचे प्रमाण पाहता २ ते ३ दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोकादायक क्षेत्रात येणाऱ्या कणेवाडी येथील १८ कुटूंबाचे शनिवारी असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले.
असनिय-घारपी मार्गावर कणेवाडी येथे मंगळवारी व बुधवारी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून घारपी कडे जाणार मार्ग पूर्णपणे बंद झाला होता.दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने घारपी व कणेवाडीचा संपर्क पूर्णपणे तुटला होता.रस्ता बंद झाल्याने घारपी येथील ४० च्या वर शालेय मुलांचे तसेच रुग्णांचे यामुळे अतोनात हाल झाले आहेत.खा.विनायक राऊत व जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी शुक्रवारी या दरडींची पाहणी करत सर्व दरडी हटविण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर शनिवारपासून डीबील कंपनीकडून दरडी हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश चव्हाण तसेच जि. प.सदस्या सौ.श्वेता कोरगावकर यांनी या परिसराची पाहणी केली.

1

4