बाबूराव धुरी:तिलारी पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन
दोडामार्ग ता.१०: तालुक्यात तिलारीच्या पाण्यामुळे बऱ्याच गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊन सुद्धा तिलारी प्रकल्पाची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी याकडे फिरकून पाहिले नाही,त्यामुळे अशा मातब्बल ठेकेदारांना यापुढे तिलारी परिसरात कामे करू देणार नाही.असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे बोलताना दिला . यावेळी त्यांनी तिलारी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहनही केले.
त्यांच्या करभाराबाबत पुरग्रस्त जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्यातील कोनाळ,घोटगेवाडी,घोटगे, परमे, कुडासे, मणेरी, सासोली या सारख्या गावातील नागरिकांचा संसार उध्वस्त झाला.मात्र या त्यांच्या दुखांत तालुक्यातील एकाही ठेकेदाराने आपाला मदतीचा हात पुढे न केल्याचे श्री.धुरी यांनी यावेळी सांगितले.