माणगावात घरांची भिंत कोसळली:दोघे थोडक्यात बचावले

523
2

कुडाळ  ता.१०-माणगाव (धरणवाडी )येथे गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे दिपक वारंग यांचं घराची भिंत कोसळली.सुदैवाने त्यावेळी घरात असलेली त्यांची बायको व मूलगी थोडक्यात बचावली.हा प्रकार आज दुपारी घडला.तर पाण्यामुळे घराच्या भिंती ओल्या झाल्यामुळे पुर्ण घर कोसळण्याची भिती आहे.
या नुकसानीचा. तलाठी शेणई यांनी पंचनामा केला.यात एक ते दीड लाखाचा नुकसान झाले आहे. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी,शिवसेना उपविभाग प्रमुख रमाकांत धुरी, युवासेना विभागप्रमुख आपा मुंज,श्री साई नार्वेकर आदीनी भेट दिली तसेच योगेश धुरी यांनी शासनस्तरावरून पालकमंत्री,आमदार,खासदार यांच्या माध्यमातून ताबडतोब मदत करू असे आश्वासन दिले.

4