परप्रांतीय भाजी विक्रेत्यांवर होणारी कारवाई सावंतवाडीत रोखली…

2

शब्बीर मणियार यांचा पुढाकार: स्थानिक व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.१०: स्वस्तात भाजी विकणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेत्यांच्या विरोधात होणारी पालिकेची कारवाई आज शिवसेनेचे जिल्हा उप संघटक शब्बीर मणियार यांच्या पुढाकारातून थांबविण्यात आली.बाहेरचे व्यापारी कमी किमतीत भाजी विकतात असा आरोप स्थानिक भाजी विक्रेत्यांनी केला होता.त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्यानुसार पालिकेचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले परंतु स्थानिक आणि परप्रांतीय विकत असलेल्या भाजीत ५ पट रकमेचा फरक असल्यामुळे अखेर ही कारवाई मागे घेण्यात आली.याबाबतची माहिती श्री.मणियार यांनी दिली,ते म्हणाले बाहेरून येणारे परप्रांतीय भाजी व्यावसायिक वीस रुपयाला कोथिंबीर पेंडी,शंभर रुपयाला मिरची किलो विकत होते.मात्र हा दर स्थानिकांकडून शंभर रुपये कोथिंबीरीची पेंडी चारशे रुपये किलो मिर्ची असा लावण्यात आला होता.त्यामुळे आपण पुढाकार घेऊन होणारी कारवाई रोखली.

10

4