राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेवणासाठी लागणाऱ्या साहित्याची केली मदत…
वेंगुर्ले ता.१०: तुळस पलतड येथील स्थलांतरित ग्रामस्थांची आज राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे तसेच तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी येथील ग्रामस्थांना जेवणासाठी लागणारे तांदूळ, डाळ व इतर साहित्य मदत केली.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिलासा देत आपण आपल्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष धर्मजी बागकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल, तालुका उपाध्यक्ष योगेश कुबल, युवक अध्यक्ष रोहन वराडकर यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री गावडे व इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी तात्काळ रस्त्याच्या बाजूला रिटर्न ऑलल बांधून,तज्ञ यांच्या साहाय्याने डोंगच्या बाजूने योग्य रस्ता करून देणे. तसेच सातत्याने आठ दिवस शेतीत पाणी राहिल्याने शेती कुसुन गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, गणेश चतुर्थी जवळ आल्याने येथील नागरिकांना पर्यायी रस्त्याची सोय करावी, काही घरांना तडे गेल्याने याची योग्य तो पंचनामा करून व्यवस्था करावी अशी मागणी आपण प्रशासनाकडे करणार असल्याचे यावेळी श्री.गावडे यांनी सांगितले. तसेच यावेळी सदर गंभीर प्रश्नी आम्ही तहसीलदार, आरोग्य यंत्रणा यांनाही सूचना दिल्या आहेत असे त्यांनी सांगितले.