वेंगुर्ले तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत चिन्मयी प्रभू,एस.एन.घाडी,स्नेहा नार्वेकर, एम.एस.परब प्रथम

153
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता,१०: वेगुर्ले तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात चिन्मयी प्रभू व एस. एन. घाडी तर १४ वर्षाखालील गटात स्नेहा नार्वेकर व एम. एस. परब यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

वेंगुर्ले तालुका क्रीडा केंद्र कॅम्प पॅव्हेलियन स्टेडीयमवर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ गुरूवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे अधिक्षक प्रदीपकुमार श्यामराव प्रभू यांचे हस्ते झाला. यावेळी क्रीडा सचिव जयराम वायंगणकर, क्रीडा केंद्र प्रशिक्षक जया चुडनाईक, संजीवनी परब, क्रीडा शिक्षक उमेश सुकी, नागेश धारगळकर, हेमंत गावडे, एस.एल.शिरोडकर, राजेश घाटवळ, संदेश रेडकर, यासह तालुक्यातील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन,वेंगुर्ले, मदर तेरेसा वेंगुर्ले, आरवली टांक, आसोली, तुळस या शाळेंचे स्पर्धक विद्यार्थी यांचा समावेश होता.
या स्पर्धेचा निकाल प्रत्येक गट व शाळां निहाय प्रथम पाच क्रमांकासह पुढील प्रमाणे आहे. १४ वर्षा खालील मुलांच्या गटात एम. एस. परब, एस. एस. सावंत ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंiलीश मिडीयम स्कुल), एस. जे. माईणकर (वेंगुर्ला हायस्कुल), जे. एल. घाटे (आसोली हायस्कुल), सी. वाय. मराठे ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन ईंग्लिश मिडीयम स्कुल) तर १४ वर्षा खालील मुलींच्या गटात स्नेहा नार्वेकर, सी. एन. धारगळकर (मदर तेरेसा इंग्लीश मिडीयम स्कुल वेंगुर्ले), व्ही. बी नाईक ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल ), एच. जी. पाटलेकर (आसोली हायस्कुल), मेधा प्रमोद कावले( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल) यांनी क्रमांक पटकाविले तर १७ वर्षा खालील मुलांच्या गटात एस. एन. घाडी( आसोली हायस्कुल), एस. आर. मालवणकर, ओ. आर. सातार्डेकर( दोन्ही सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल), एस. एम. वालावलकर ( वेंगुर्ले हायस्कुल), व्ही. एस. गावडे ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल), १७ वर्षा खालील मुलांच्या गटात चिन्मयी प्रदीपकुमार प्रभू (वेंगुर्ला हायस्कुल), एस. एस. धुरी (आसोली हायस्कुल), एम. आर. नाईक ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल), एस. एस. घाटे (असोली हायस्कुल) यांनी क्रमांक पटकाविले.

\