माणगाव-शिवापूर मधील लोखंडी पूल गेले पुराच्या पाण्यात वाहून

537
2
Google search engine
Google search engine

नागरिकांची गैरसोय; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष…

माणगाव ता.१०:  खोऱ्यामधील शिवापूर येथील लोखंडी पूल दोन दिवसापूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार खाल्ला आहे.त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.मात्र संबंधित प्रशासनाने या ठिकाणी येऊन कोणतीही पाहणी न केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
गेले आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात वाहून गेलेल्या संबंधित पुलाच्या लगत आणखीन एक पूल आहे.मात्र पूरजन्य परिस्थितीत या पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग होत होता.सद्यस्थिती हे पूल सुद्धा वाहून गेल्यामुळे पूरजन्य परिस्थिती या ठिकाणच्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.तर संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ या पुलाची दुरुस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.