पूर परिस्थितीमुळे बांद्यात २८८ व्यापारी व कुंटूबांचे नुकसान…

214
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बैठकीत माहीती उघड:दोन दिवसात इन्शुरन्स दया, पालकमंत्र्यांचे आदेश…

बांदा ता.१०: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे बांद्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत तब्बल १८८ कुटुंबांचे नुकसान झाले आहे.अशी माहिती आज येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत पुढे आली .दरम्यान नुकसान झालेल्या व्यापारी व कुटुंबाचे तात्काळ पंचनामे करून दोन दिवसात त्यांना इन्शुरन्स देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे,अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिल्या.
श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत आज बांदा ग्रामपंचायतीत बैठक झाली.शहरातील १८८ घरांच्या नुकसानीचे प्रत्येकी १० हजार रुपये येत्या मंगळवारी खात्यात जमा करण्याचे आदेश केसरकर यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिलेत.तर १५० दुकान व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान शासन पातळीवर मिळवून देण्यासाठी आपण मंत्री परिषद मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन केसरकर यांनी दिले.यावेळी केसरकर यांनी महावितरण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य खात्याचा आढावा घेतला. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वच विभागानी एकमेकांशी ताळमेळ साधत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत,अशा सूचना केसरकर यांनी केल्यात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ पोलीस ठाणी आहेत. आपत्ती काळात लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी येत्या १५ दिवसात प्रत्येक पोलीस ठाण्याला बोट देण्यात येणार आहे.आरोग्याची काळजी घेण्यासाठी टीसीएल पावडर व औषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत.यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, मंडळ अधिकारी आर. व्ही. राणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, सरपंच मंदार कल्याणकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता लव्हेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, तलाठी फिरोज खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, अशोक दळवी, रुपेश राऊळ, शीतल राऊळ, राजेश विरनोडकर, सुशांत पांगम, साईप्रसाद काणेकर, रिया आल्मेडा, स्वप्नाली पवार, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

\