पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी मदतीला धावले शेकडो हात…. युवकांचा पुढाकार:सावंतवाडीसह जिल्ह्यातील दात्यांनी दिल्या अनेक जीवनावश्यक वस्तू

477
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१०:  कोल्हापूर-सांगली आदी भागात पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो हात पुढे आले व शहरातील युवक पिंट्या देसाई यांनी केलेल्या आवाहनाला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.व अनेक जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिल्या.
येथील पर्णकुटी विश्रामगृहावर या वस्तू जमा करून टेम्पो च्या साह्याने त्या सांगली-कोल्हापूरला पाठवण्यात येणार आहेत,असे श्री देसाई यांनी सांगितले.सकाळपासून त्यांनी केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला.यात बिस्किट,पाण्याच्या बाटल्या,कपडे,पायपुसणी,चटई यासह औषधे अशा विविध वस्तू अनेकांनी स्वतः फोनाफोनी करून देसाई यांच्या ताब्यात दिल्या.या सर्व वस्तूंनी येथील पर्णकुटी विश्रामगृहाचे सभागृह फुलून गेले होते.
यावेळी नगरसेवक मनोज नाईक,अजय सावंत,सुरज करिवडेकर,प्रमोद गावडे,शुभांगी सुकी,यशवंत नार्वेकर,दीपा सावंत,सुचित्रा देसाई,वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.

\