कोकणातील रेल्वे वेळेवर…. दक्षिण-मध्य गाड्या मात्र रद्द…

399
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कणकवली, ता.१० : अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. मध्य, दक्षिण आणि दक्षिण – पश्चिम रेल्वेतील अनेक गाड्या पुर्णतः रद्द झाल्या आहेत. मात्र कोकण कन्या, तुतारी, मांडवी, दिवा पॅसेंजर यासह कोकणरेल्वे मार्गावरील नियमित गाड्यात वेळेत धावत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर ९ व १० ऑगस्टला कोकण रेल्वे मार्गावरुन जाणार्‍या राजधानी व ओखा एक्सप्रेस रद्द झाल्या आहेत.१० व ११ ऑगस्टची चंदीगड, नेत्रावती एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. १२ ऑगस्टची नेत्रावती, पुणे एर्नाकुलम, डाऊन मंगला एक्स्प्रेस, कोचुवेली एक्स्प्रेस, १३ ऑगस्ट व १४ ऑगस्टची एर्नाकुलम-पुणे या गाड्या रद्द केल्या आहेत.

\