Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातयारी असेल तर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे...

तयारी असेल तर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे…

वैभव नाईक यांचे माजी खासदार नीलेश राणेंना आव्हान

मालवण, ता.10 ः माजी खासदार नीलेश राणे यांनी आधी निवडणुकीचे आव्हान स्वीकारावे. आम्ही मुकाबल्यासाठी सज्ज आहोत असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी आज दिले. देवली-वाघवणे प्राथमिक शाळा येथे आमदार वैभव नाईक यांचे जनसंवाद अभियान झाले. या कार्यक्रमात आमदार वैभव नाईक बोलत होते.
श्री.नाईक म्हणाले, मालवणातील वीज उपकेंद्र खासदार विनायक राऊत यांनी मंजूर करून आणले आणि त्याचे उद्घाटनही केले. पण स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे या उपकेंद्रापर्यंत येणार्‍या वीज वाहिन्यांचा मार्ग रखडला होता. त्यामुळे वीज उपकेंद्राचे उद्घाटन होऊन देखील वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. आता वीज मार्गातील अडथळे दूर झाले असून लवकरच वीज उपकेंद्र सुरू होणार आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या जनसंवाद कार्यक्रमावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जान्हवी सावंत, श्‍वेता सावंत, संजय गावडे, सरपंच गायत्री चव्हाण, हरीश्‍चंद्र चव्हाण, प्रियांका रेवंडकर, मंदार
गावडे, प्रविण लुडबे, दाजी चव्हाण, गणेश चव्हाण, सुरेश नाईक, दिलीप चव्हाण, विठू चव्हाण, अभिषेक चव्हाण, मोहन चव्हाण तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
देवली येथील कार्यक्रमात देवली गावासाठी आवश्यक असणारे रस्ते मंजूर करून तसेच तब्बल 60 वीज खांब उभारून स्ट्रीट लाईट सुरू केल्याबद्दल आमदार वैभव नाईक आणि जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी इतर शिल्लक असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी केली. तसेच खालची देवली आणि वरची देवली जोडण्यासाठी एक सुसज्ज रस्ता निर्माण
करण्याचीही मागणी करण्यात आली.
वाघवणे येथील धरणाचे बांधकाम करण्यात आल्यास गावातील पाणी टंचाईची समस्या सुटू शकते, असेही ग्रामस्थांनी सांगितले. जनसंवाद अभियानात उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या सूचना आमदारांसमोर मांडल्या.
यावेळी एक ज्येष्ठ नागरिक महिलेने आमदारांच्या कामकाजाचे कौतुक करत
आपल्या कुटुंबियांचा वारस तपास तलाठी कार्यालयात करण्यासाठी सहकार्य करण्याचे विनंती केली. आमदार नाईक यांनी तात्काळ तलाठ्यांना सांगून वारस तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी देवलीतील आजपर्यंत कधीही डांबरीकरण न झालेले रस्ते आमदारांमुळे डांबरीकरणाने सुसज्ज झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्री.नाईक म्हणाले, जनसंवाद अभियानावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र आजपर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये इतरही राजकीय पक्षांची मंडळी आमदारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडत आहेत. तसेच शासनाकडून मिळत असलेल्या योजनांबद्दल समाधानही व्यक्त करत आहेत. आज देवलीतही एक युवक
बिनधास्तपणे आपल्या गावातील समस्येसंदर्भात बोलला, यातून हे अभियान यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments