स्वाभिमानच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा पूनम चव्हाण शिवसेनेत…

681
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन…

मालवण, ता. १० : शिवसेनेने मालवणात पुन्हा एकदा स्वाभिमान पक्षाला धक्का दिला आहे. स्वाभिमान महिला जिल्हा उपाध्यक्षा पूनम चव्हाण व पती नागेश चव्हाण यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येकाला योग्य तो मानसन्मान देण्याचे काम नेहमीच शिवसेनेच्या वतीने झाले. त्याच धर्तीवर योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आमदार नाईक यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, संजय गावडे, किरण वाळके, नगरसेविका सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, महेंद्र म्हाडगूत, नरेश हुले, अंजना सामंत, पंकज साधये, दत्तात्रय नेरकर, पूजा तोंडवळकर, स्वप्नील आचरेकर यासह अन्य उपस्थित होते.

\