असनिये घारपीसाठी पर्यायी रस्ता करणार…

2

दीपक केसरकर:स्थलांतरीत लोकांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार…

ओटवणे.ता,१०: दरडीमुळे स्थलांतरित केलेल्या असनिये-कणेवाडी येथील २४ कुटुंबातील लोकांची कोणतीही असुविधा होणार नाही,याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल,धोकादायक असलेल्या कणेवाडीचे भूगर्भ तज्ज्ञांच्या मार्फत सर्वेक्षण केले जाईल तसेच वेळ पडल्यास स्थलांतरित ग्रामस्थांचे पुनर्वसन करून शासनामार्फत नवीन घरे बांधून दिली जातील, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री असनिये येथे दिले.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दरडीमुळे स्थलांतरित केलेल्या असनिये-कणेवाडी येथील २४ कुटुंबातील लोकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई,वीज वितरणचे पाटील,तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी,उपतालुका प्रमुख दीपक गावडे,भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख संजय सावंत,संदीप सावंत तसेच भूगर्भ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
असनियेतील परिस्थिती बाबत प्रशासनाने योग्य ती माहिती न दिल्याने, श्री.केसरकर यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.कणेवाडी येथील २४ कुटुंबातील १०० लोक स्थलांतरित झाले ही गंभीर बाब आहे.या कुटुंबातील लोकांची कोणतीही असुविधा होणार नाही,याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल.धोकादायक असलेल्या कणेवाडीचे भूगर्भ तज्ज्ञांच्या मार्फत सर्वेक्षण केले जाईल तसेच वेळ पडल्यास स्थलांतरित ग्रामस्थांचे पुनर्वसन करून शासनामार्फत नवीन घरे बांधून दिली जातील.स्थलांतरित म्हणून शासनाकडून मिळणारी मदत मंगळवार पर्यंत कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर जमा होणार आहे.कणेवाडी-घारपीसाठी पर्यायी मार्गाचे काम तात्काळ हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री केसरकर यांनी दिले.

18

4