मालवण, ता. १० : भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टला दुपारी साडे तीन वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे लायन्स व लायनेस क्लबच्यावतीने आणि सहदेव बापर्डेकर मरीन पुरस्कृत देशभक्तीपर वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा ही पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटात होणार आहे. तरी ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी १३ ऑगस्टपर्यंत उदय घाटवळ मोबा. ९४२२०७८०६६ यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेची प्राथमिक फेरी १४ ऑगस्टला दुपारी तीन वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्पर्धेत पहिल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये, दुसऱ्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे १५००, १०००, ७०० अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
१५ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता देशभक्तीपर गीतांचा अनोखा नजराणा ऑर्केस्ट्रा ‘अजिंक्य भारत’ सादर होणार आहे. तरी मालवणातील सर्व देशभक्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.