सावंतवाडी-दोडामार्गात खचलेल्या डोंगरांची पाहणी करण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ दाखल

2

पालकमंत्री केसरकर व खासदार राऊतांच्या उपस्थितीत होणार सर्वेक्षण

सावंतवाडी ता.११: शिरशिंगे,झोळंबे,असनिये-घारपी आदी ठिकाणी झालेल्या डोंगराच्या भूस्खलनाची पाहणी करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांची टीम आता काही वेळात सावंतवाडीत दाखल होणार आहे.पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या डोंगरांची व नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.गेले चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील डोंगर खचले होते.भूस्खलन झाले होते.यात घारपी गावाचा संपर्क तुटला होता.तर शिरशिंगे येथील घरे असलेल्या ठिकाण खालचा भाग घेतला होता.झोळंबे परिसरातील परिस्थिती निर्माण झाली होती.माडखोल मध्ये काही ठिकाणी डोंगर खचला होता.
या पार्श्वभूमीवर भूगर्भ शास्त्रज्ञांची टीम आणून योग्य अहवाल केला जाईल असे आश्वासन श्री.केसरकर यांनी केले होते.त्यानंतर पुणे येथील भूगर्भशास्त्रज्ञना या ठिकाणी बोलावण्यात आले होते.परंतु त्यांनी तब्बल तीन दिवस देण्यास नकार दिला होता.त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांना तात्काळ या,अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा दिला होता.त्यानंतर काल सायंकाळी उशिरा रत्नागिरी येथील अधिका-याची टीम दाखल झाली आहे.

21

4