पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्र बाधित…
सिंधुदुर्गनगरी.ता,११: पुराचा जबर फटका शेतीलाही बसला आहे. जिल्हयातील भात शेतीचे २३८ गावातील २३ हजार ३३१ शेतकऱ्यांचे ९ हजार ३४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर इतर पिकांमध्ये ३८८ गावातील ५ हजार ५२९ शेतकऱ्यांचे ६३५.४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
भात शेतीमध्ये देवगड तालुक्यातील ९ गावातील १७१ शेतकऱ्यांचे ७४ हेक्टर क्षेत्र बाधित तर इतर पिकांमध्ये देवगड मधील २७ गावातील २०८ शेतक-यांचे ५१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मालवणमध्ये भात पिकाचे २६ गावातील ५ हजार २१५ शेतकऱ्यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांमध्ये ७८ गावातील १ हजार १३० शेतकऱ्यांचे १०८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कणकवली तालुक्यातील १९ गावातील ३ हजार ८४२ शेतकऱ्यांचे ११६ हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांमध्ये ५४ गावातील ९३४ शेतक-यांचे ४ हजार २६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. वैभववाडी मधील ७ गावातील १७८ शेतकऱ्यांचे ६४ हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांमध्ये २५ गावातील ७४८ शेतकऱ्यांचे ३७ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सावंतवाडी मधील २४ गावातील ५ हजार ८७० शेतकऱ्यांचे १ हजार ३९९ हेक्टर व इतर पिकांचे ३७ गावातील १ हजार ७५ शेतकऱ्यांचे ५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दोडामार्ग मधील भात पिकाचे २१ गावातील १ हजार १३८ शेतकऱ्यांचे ४५२ हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांचे २९ गावामध्ये २२३ शेतकऱ्यांचे ४१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. वेंगुर्ला तालुक्यातील २७ गावामधील १ हजार ९९६ शेतकऱ्यांचे ६९८ हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांचे ३३ गावातील ६९० शेतकऱ्यांचे ४२ क्षेत्र बाधित झाले. कुडाळ तालुक्यातील भात पिकाचे १०५ गावातील ४ हजार ८२० शेतक-यांचे ३६४२.२० हेक्टर क्षेत्र तर इतर पिकांचे १०५ गावातील ५२१ शेतक-यांचे २६७ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. या सर्व पिकांचा राज्य शासनाच्या कृषी विभागाने पंचनामा करून सहसंचालक यांना पाठविला आहे. आता नुकसान भरपाईची प्रतिक्षा आहे.