वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्यांवर कारवाई करा

2

भालचंद्र जाधव; अधिक्षक अभियंत्यांना निवेदनाव्दारे इशारा

वैभववाडी.ता,११: वैभववाडी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता मुल्ला यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी व त्यांच्या जागी नवीन सहाय्यक अभियंता यांची नियुक्ती व्हावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जाधव यांनी अधिक्षक अभियंता कुडाळ यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
वीज वितरण समस्या संबंधित वेळोवेळी उपोषण केले. परंतु त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झालेली नाही. मुल्ला यांच्या बदलीचा प्रस्ताव मुख्य अभियंताकडे पाठवतो असे तीनवेळा सांगूनसुद्धा त्यांची बदली झाली नाही. विद्युत पोल उपलब्ध होताच तात्काळ कोकिसरे येथील पोल जोडणीचे काम पूर्णत्वास नेणे, शेती पंपाचे कनेक्शन जिथे शक्य आहे तेथे सौर ऊर्जावर उर्वरित ठिकाणी लाईन टाकून देणे. अशी अनेक आश्वासन कार्यकारी अभियंता विभाग कणकवली यांनी दिली होती. परंतु अद्याप कोणतीही आश्वासनाची पूर्तता संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जाधव, श्रीराम शिंगरे, डॉ. शेखर कानेटकर, अनंत नादलसकर, गुरुनाथ मन्यार, अशोक राणे, भगवान जाधव आदी उपस्थित होते.

15

4