प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन;शिक्षक दिना’ दिवशी पुरस्कार जाहीर…
सावंतवाडी ता.११:नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील दोन उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.हे पुरस्कार ५ सप्टेंबर म्हणजेच ‘शिक्षक दिना’ दिवशी जाहीर केले जाणार आहेत.जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आपले प्रस्ताव ३० ऑगस्ट पर्यंत संस्थेकडे पाठवावेत असे आवाहन नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ए. बी.राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम झारापकर व मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर यांनी केले.
गुरूवर्य कै. ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ नलिनी ज. पेंढारकर यांनी पुरस्कार जाहीर केला असून पुरूष शिक्षकांनी तर सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी कै. प्रमिला जाधव यांच्या नावे पुरस्कार जाहीर केला असून याकरिता स्त्री शिक्षकांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.