विनायक राऊत; कोकणच्या जनतेला गणेश चतुर्थीची भेट…
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.११: येथील रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा देण्यात येणार आहे.तसेच तुतारी एक्सप्रेसचे डबे वाढविण्याबरोबरच दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर ही गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली.
सावंतवाडी येथे झालेल्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याने ही मागणी मान्य करून ऐन गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री.राऊत यांनी कोकणातील लोकांना ही भेट दिली आहे.
याबाबतची माहिती श्री.राऊत यांनी दिली.ते म्हणाले, सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात याव्यात यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी पालकमंत्री श्री.केसरकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. व याबाबत आपण खासदार राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते.त्यानंतर आम्ही दोघांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतल्या नंतर त्यांनी तात्काळ या मागणीला हिरवा कंदील दिला आहे.त्याचबरोबर मेंगलोर एक्सप्रेसचे कोच वाढविण्यासंदर्भात तसेच या एक्सप्रेसला सुद्धा सावंतवाडीत थांबा देण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत.लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.