स्थलांतरित असनिये-कणेवाडी व झोळंबे ग्रामस्थांना मदतीचा हात…

2

सावंतवाडी प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार;धान्याचे वाटप…

ओटवणे ता.११: दरडींमुळे स्थलांतरित झालेल्या असनिये-कणेवाडी व झोळंबे ग्रामस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.रविवारी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी यांच्या वतीने स्थलांतरित ग्रामस्थांना धान्याचे वाटप सावंतवाडीचे तहसीलदार राजराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
असनिये कणेवाडी व झोळंबे दापटेवाडी येथील ग्रामस्थांना दरडींमुळे स्थलांतरित करण्यात आले आहे.असनिये येथील २६ कुटुंबातील तर येथील ६ कुटुंबातील ग्रामस्थांना वेगववेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.या ग्रामस्थांना विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे.
रविवारी असनिये प्राथमिक शाळा येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी यांच्या वतीने स्थलांतरित ग्रामस्थांना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजराम म्हात्रे,शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल देसाई,अध्यक्ष पुरुषोत्तम शेणई,सचिव बाबाजी झेंडे,मुख्याध्यापिका मृगली पालव,गुरुनाथ राऊळ, प्रमोद पावसकर, अमोल पाटील,नेहा सावंत, सुजाता गवस,प्रशांत कांदे,दीपक राऊळ, नरेंद्र सावंत,विजय गावडे,विजय देसाई, संदीप गवस आदी उपस्थित होते.

8

4