बाहेरचावाडा येथील घटना:सात दिवसापूर्वी पासून होते बेपत्ता…
सावंतवाडी.ता,११: कोलगाव येथून बेपत्ता असलेल्या शेखर नारायण परब (वय ४५) यांचा मृतदेह आज बाहेरचावाडा परिसरातील ओहोळात आढळून आला.
गेले सहा ते सात दिवस ते बेपत्ता होते. याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान आज दुपारी बाहेरचावाडा परिसरात दुर्गंधी येत असल्याची काही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला.दरम्यान तो परब यांचा असल्याचा संशय काही लोकांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांचे बंधू रामचंद्र परब यांना कल्पना देण्यात आली .यावेळी त्यांनी हा मृतदेह आपल्याच भावाचा असल्याचे सांगितले.मानसिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.