पुनर्वसन नको,आमच्या घरांनाच सुरक्षा द्या…

551
2

खासदार विनायक राऊत यांच्याकडे शिरशिंगेवासियांची मागणी…

सावंतवाडी ता.१: डोंगर कोसळला तरी आमच्या वडिलोपार्जित घरात आमचा जीव गुंतला आहे.त्यामुळे आमचे पुनर्वसन नको,आमच्या घरांनाच सुरक्षा द्या,अशी मागणी शिरशिंगेवासीयांनी आज खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली.यावेळी लोकांची मागणी असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सुरक्षा कठडे उभारून द्या,अशा सूचना खासदार राऊत यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना केल्या.दरम्यान भूगर्भ शास्त्रज्ञांकडून केलेल्या तपासणीत डोंगराला पडलेले तडे हे वरच्यावर आहेत.जमिनीच्या आतील दगड सुस्थितीत आहेत.त्यामुळे तूर्तास तरी या घरांना धोका नाही,असा प्राथमिक अहवाल शास्त्रज्ञ सागर देसाई यांनी दीला.तर एक्सपर्ट ओपिनियन म्हणून वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञांना सल्ला घेण्याचा निर्णय यावेळी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
खासदार राऊत यांनी आज शिरशिंगे येथील गोठवेवाडी येथील धोकादायक झालेल्या घरांना भेट दिली त्यानंतर तेथील ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमची घरे ही वडिलोपार्जित आहेत अनेक वर्षांनी त्याच ठिकाणी राहतो त्यामुळे याच ठिकाणी आमच्या घरांना संरक्षण द्या .आवश्यक असलेले कठडे बांधून द्या सद्यस्थिती लक्षात घेता पुनर्वसन करण्याचा किंवा येथून बाहेर जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. त्यामुळे तात्पुरते बंद घरांना पोलिस संरक्षण दया अशा विविध मागण्या केल्या. तसेच काही भाग हा अतिशय धोकादायक आहे त्यामुळे त्याठिकाणी काही उपाययोजना करता येऊ शकतात का याबाबत ग्रामस्थांनी विचार करावा तसेच ज्या ठिकाणी डोंगराला खाचा पडल्या आहेत त्या बुजविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना भूगर्भशास्त्र सागर देसाई यांनी ग्रामस्थांना केल्या यावेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी सुद्धा ग्रामस्थांना आवाहन केले पाऊस मोठ्या प्रमाणात आहेत अजूनही डोंगरावर भूस्खलन होत आहे त्यामुळे लोकांनी रिस्क घेऊ नये पुनर्वसन मान्य नसेल तर तात्पुरते अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी केल्या.
यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, विक्रांत सावंत, रुपेश राऊळ, सागर नानोस्कर, सुरेश शिर्के, सोनू गवस, गुणाजी गावडे, अशोक दळवी ,नागेंद्र परब आदी उपस्थित होते

4