खांबाळेअधिकारी, लाईनमन यांच्या बेजबाबदारपणाचा गावाला फटका
वैभववाडी/पंकज मोरे गेल्या दहा दिवसापूर्वी जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे खांबाळे गाव तब्बल दहा दिवस अंधारात आहे. वीज नसल्यामुळे या गावचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पाऊस पडूनही लाईटीविना पाण्यासाठी दुष्काळ आहे.
तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून वादळी वा-यासह मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे. या वादळी वा-याचा फटका खांबाळे गावाला बसल्याने या गावचा विद्युत पुरवठा तब्बल दहा दिवस खंडीत झाला आहे. त्यामुळे येथील लोकांना लाईटीविना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे.
लाईट नसल्याने या गावावर ‘पाणीबाणी’ च संकट कोसळले आहे. मात्र वीज वितरणचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. या गावचा तब्बल दहा दिवस वीज पुरवठा खंडीत असून वीज वितरणकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तालुक्यात वीज वीतरणच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झाला आहे. अधिकारी, लाईनमन यांच्या बेजबाबदारपणामुळे गाववाल्यांना फटका बसला आहे. तरी लवकरच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास उद्रेक होण्याची दाट संभवना आहे.