Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामसुरेत स्वाभिमानला मोठे खिंडार...

मसुरेत स्वाभिमानला मोठे खिंडार…

कट्टर राणे समर्थक छोटू ठाकूर शिवसेनेत ; आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन…

मालवण, ता. ११ : मसुरे डांगमोडे गावातील कट्टर राणे समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी आज शेकडो ग्रामस्थांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा खांद्यावर घेतला.
आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. संपूर्ण गावचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. पक्ष प्रवेशाचा निर्णय ग्रामस्थांना सोबत घेऊन घेतला असून मी ग्रामस्थांच्या सोबत आहे. शिवसेना जी जबाबदारी देईल ती जबाबदारी घेऊन मर्डे-मसुरे-डांगमोडे गावासह संपूर्ण परिसरात पक्ष संघटना अधिक मजबूत करणे व विकासकामातून जनतेची सेवा करणे हेच आपले कर्तव्य असेल असे प्रवेशकर्त्या छोटू ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले.
जनसंवाद अभियानच्या माध्यमातून मसुरे दौर्‍यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत डांगमोडे गावात श्री. ठाकूर यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गोपी पालव, नगरसेवक सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, संदीप हडकर, शाखाप्रमुख सचिन पाटकर, प्रकाश ठाकूर, सुजाता पेडणेकर, माया मुणगेकर, विभागप्रमुख पराग खोत, राजा कोरगावकर, सुहास पेडणेकर, बाबू पारकर, विजय पालव, श्वेता सावंत, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, पूजा तोंडवळकर, हेमंत परब, मामा पेडणेकर, मोहन मुणगेकर, आबा परब, पंकज वर्दम, महेंद्र म्हाडगूत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी ’छोटू ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा दिल्या.
खाजनवाडी येथील स्वाभिमान कार्यकर्ते पिंट्या गावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गोपी पालव, हरी खोबरेकर, बबन शिंदे, जान्हवी सावंत यांनी छोटू ठाकूर यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. एक कार्यकर्ता नव्हे तर एक जनसेवक शिवसेनेत पुन्हा प्रवेश करत आहे. याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
छोटू ठाकूर यांच्या रूपाने जनतेचा मोठा पाठिंबा असलेला एक भक्कम कार्यकर्ता, समाजसेवक पुन्हा शिवसेनेत आला आहे. ठाकूर यांचा योग्य तो मानसन्मान शिवसेनेत ठेवला जाईल तसेच त्यांनी सुचवलेल्या गावातील प्रत्येक विकासकामांना प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments