सावंतवाडी, ता.११ : लायन्स व लायनेस क्लब सावंतवाडी कडून शेर्ले येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.यात अन्न,कपडे,औषधे,भांडी ,प्लॅस्टिक खुर्चा तसेच आर्थिक मदतही देण्यात आली.
शेर्ले गावातील कापाईवाडी मधील अतिवृष्टी तसेच पुरामुळे मोठे नुकसान झाले. लायन्स व लायनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांची भेट घेतली यावेळी तहसीलदार लायन्स राजाराम म्हात्रे, लायन्स अध्यक्ष रवि सावंत , लायनेस अध्यक्षा अपर्णा कोठावळे , राजन पोकळे ,संतोष चोडणकर,महेश पाटील,प्रशांत कोठावळे ,दत्तू नार्वेकर,बाळासाहेब बोर्डकर,गजानन नाईक, अशोक देसाई, सरपंच उदय धुरी, जि.प ,सदस्य उन्नती धुरी,बाळासाहेब बोर्डेकर,बलवंत कुतडकर, महेश कोरगावकर, संदेश परब, महेश भाट, डी.के सावंत पुरग्रस्त व शेर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.