कुडाळ, ता.११ : आमदार वैभव नाईक यांनी आज दुर्गम अशा शिवापुर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शिवापूर येथील लोखंडी साकव पुराच्या पाण्याने वाहून गेला. झाडे अडकल्याने पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे ग्रामस्थांची व शालेय मुलांची गैरसोय झाली आहे. आमदार नाईक यांच्या सूचनेनुसार जेसीबीच्या साह्याने पुलावर अडकलेली झाडे बाजूला करून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.तसेच येत्या आठ दिवसात वाहून गेलेल्या साकवाचे काम सुरू होईल असे ग्रामस्थांना आश्वासन देण्यात आले.
शिवापूर मध्ये जाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने आमदारांनी स्वतः जेसीबी मधून शिवापूर गाव गाठले. जेसीबी मधून आलेल्या आमदारांना पाहून ग्रामस्थांना कुतुहूल वाटले आणि कौतुकही केले उपस्थित ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.
यावेळी शिवपुरचे सरपंच यशवंत कदम, हळदीचे नेरूर सरपंच सागर म्हाडगुत ,ॲड सुधीर राऊळ ,संतोष बांदेकर, रामचंद्र धुरी, अमित परब,आदी उपस्थित होते.