राजन तेली:भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने टीका
बांदा.ता,११: जिल्हा नियोजन मध्ये दोन टक्के निधी हा आपत्ती निवारण्यासाठी असतो, हे पालकमंत्री दीपक केसरकर यांना बहुदा माहीत नसावे. जिल्ह्यातील कित्येक गावे ही पुरबधित असल्याचे जिल्हा प्रशासनाला माहिती असूनही बोटींची सोय का करण्यात आली नाही? केसरकर यांना निवडणूकित भाजपचे कार्यकर्ते हवे असतात मग पुरस्थितीची पाहणी करताना त्यांना भाजपचे कार्यकर्ते दिसले नाहीत का? असा सवाल उपस्थित करत पुरपरिस्थितीवेळी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
येत्या दोन दिवसात आम्ही मुख्यमंत्री फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी मागणी करणार असल्याचे तेली यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच मंदार कल्याणकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, शहर अध्यक्ष केदार कणबर्गी, दादू कविटकर, बाळा आकेरकर, प्रियांका नाईक, सुनील धामापूरकर, किशोरी बांदेकर आदी उपस्थित होते.