पालकमंत्र्यांनी स्वत:ची खाणावळ सुरू करावी; ६० आणि ४० रूपयात दिवसाचे जेवन होणार काय?
कणकवली, ता.११ : डोंगरांचे भुत्स्खलन व पुरात अडकलेल्या लोकांसाठी पालकमंत्र्यांनी मोठ्या व्यक्तींसाठी ६० रुपये तर छोट्यांसाठी ४५ रुपये जाहीर केले़ एवढ्या कमी रक्कमेत दोन टाईमचे जेवन, नाष्टा, चहा देण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:ची खानावळ सुरू करावी़ केवळ सर्वसामान्य पुरग्रस्तांची पालकमंत्र्यांनी थट्टा चालवली आहे़. देवबाग ग्रामस्थांना फसविणारे शिवसेना खा़ विनायक राऊत, आ़ वैभव नाईक यांना शनिवारी पळवून लावले़. जनतेचा उद्रेक खोटी आश्वासने दिल्यानेच होत असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस माजी आ़ परशुराम उपरकर यांनी केला़.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़. यावेळी संतोष सावंत, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते़.
देवबाग ग्रामस्थांना आ़ वैभव नाईक यांनी बंधाऱ्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याची खोटी बतावणी केली होती़ तसेच मालवण शहरापासून रिंगरोड बंधारा २०० कोटींचा होणार अशी घोषणा आमदारांनी केली होती़ मात्र अतिवृष्टीत ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानामुळे संतप्त भावना झाल्या होत्या़ सायंकाळी ७ वा़ आमदार जनसंवादासाठी जाणार होते़ ते उशिरा गेले़ जीओट्युब बंधाऱ्यासाठी निधी मंजूर असला तरी पर्यावरण दाखला खासदारांच्या अपयशामुळे मिळाला नाही़. आता खासदार मंजूरीसाठी प्रयत्न करणार असे सांगतात, मग गेले वर्षभर झोपले होते का? गेल्या पाच वर्षात पालकमंत्री दीपक केसरकर, खा़ विनायक राऊत, आ़ वैभव नाईक यांनी केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले आहे़. त्यामुळे त्यांच्या विरोधात जनतेचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले़.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भुत्स्खलन होऊन मोठी हाणी झाली आहे़ नागरीक भितीच्या वातावरणात असताना पालकमंत्र्यांचे वरातीमागून घोडे नाचत आहेत़. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी गोव्याच्या धर्तीवर आपत्कालीन विभाग काम करणार असल्याची घोषणा केली़. त्यासाठी नवीन १२ बलेरो गाड्या घेणार असल्याचे जाहीर केले़. मात्र त्या गाड्यांसाठी लागणारे डिझेल आणि चालकांसाठी काय तरतूद केली? महाराष्ट्र एवढे मोठे राज्य असताना गोव्याची आपत्कालनी व्यवस्था आपल्याकडे कशासाठी? केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम पालकमंत्री करत आहेत़.
दोन वेळ जेवणासाठी जाहीर केलेली रक्कम ही जनतेची चेष्टा आहे़. जिल्ह्यात झालेल्या पडझडीबाबत प्रशासन कोणतीही हालचाल करताना दिसत नाही़. निवडणुकीच्या तोंडावर केवळ भपकेबाजी करण्याचे काम केसरकर करत आहेत़. मात्र जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे़. फसव्या घोषणांना या निवडणुकीत सत्ताधाऱ्याना जनताच चोख उत्तर देईल, असा विश्वास परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला़.