राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या सौजन्याने स्थलांतरीत कुटुंबियांना धान्य पुरवठा
वेंगुर्ले.ता,११: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावात अतिवृष्टीमुळे पलतड येथिल डोंगर कोसळल्याने परबवाडी येथिल घरांना धोका निर्माण झाला असुन येथिल सुमारे ३४ कुटुंबांना नजिकच्या शाळेत स्थलांतरित केले आहे, आज वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक श्री विलास गावडे यांच्या समवेत परबवाडी येथिल ग्रामस्थांना भेट देत त्यांना धीर दिला, तसेच श्री विलास गावडे यांच्या सौजन्याने स्थलांतरीत कुटुंबियांना तांदुळ,तुरडाळ,तेल,साखर,चहा पावडर, दुध पावडर लहान मुलांसाठी बिस्किट बाँक्स आदी साहित्य दिले.
यावेळी संबधित ग्रामस्थांनी आपल्या व्यथा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या तसेच प्रशासना विरोधात तिव्र भावना व्यक्त केल्या. तसेच रहदारीचा रस्ता खचल्याने आता पर्यायी रस्ता प्रशासनाने मोकळा करुन दिला नसल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी विलास गावडे यांनी स्थलांतरित कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझा बांधव असुन सामाजिक जाणिवेतुन आज मी याठिकाणी आलो आहे येथिल सर्व कुटुंबियां सोबत मी असुन पर्यायी रस्ता व येथिल कुटुंबियांच्या स्थलांतरा बाबत तसेच स्थलांतरित कुंटुबियांच्या नुकसानीचा पंचनामा याबाबत जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधुन लवकरात लवकर पुढिल कार्यवाही करण्यास त्यांना भाग पाडू असे सांगितले. तसेच श्री. गावडे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येथिल कोसळलेल्या डोंगराची, घरांची, खचलेल्या रस्त्याची पाहणी केली.
यावेळी वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दादा परब, प्रांतिक सदस्य इर्षाद शेख, श्रीम कुंदा पै,पंचायत समिती माजी सदस्य समाधान बांदवलकर, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, नगरसेविका सौ कृतिका कुबल, नगरसेविका श्रीम स्नेहल खोबरेकर, होडावडा माजी सरपंच सौ रुपल परब, होडावडा माजी उपसरपंच राजबा सावंत,अब्दुल शेख आदी उपस्थित होते. यावेळी येथिल स्थलांतरीय ग्रामस्थांनी विलास गावडे यांनी धान्य भेट आणि धीर दिल्याबद्दल गावडे यांचे आभार मानले.