बांदा पंचक्रोशीतील पूरग्रस्तांची काळजी जिल्हा आरोग्य विभाग घेणार

2

सहा वैदयकीय पथके तैनात:सकाळच्या सत्रात रोज केली जाणार तपासणी

बांदा
अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या बांदा शहर व परिसरातील सहा गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सहा वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून रोज सकाळच्या सत्रात संबंधित पूरग्रस्तांची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी दिली.
बांदा शहर व परिसरातील एकूण ६ गावे ही पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत. विहिरीतील पाणी शुध्दीकरणासाठी आरोग्य विभाग व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन एकत्रित काम करत असून लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच या भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी डॉ. चाकूरकर व डॉ. खलीपे बांद्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, डॉ. करतस्कर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बांदा, इन्सुलि, शेर्ले, वाफोलि गावातील पूरग्रस्त परिसराची पाहणी केली.

1

4