आम. वैभव नाईक यांच्यावतीने शहरात १ हजार लिटर दुधाचे वाटप…

2

मालवण, ता. ११ : कोल्हापूर व सिंधुदुर्गातील पूर परिस्थितीमुळे तिन्ही घाट मार्ग बंद असल्याने सिंधुदुर्गात दुधाचा तुटवडा भासत आहे. मालवण तालुक्यातही दुधाची कमतरता भासत असल्याने शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावतीने शहरात भरड नाका येथे दूध वाटप करण्यात आले. सुमारे १ हजार लिटर दुधाचे वाटप बहुसंख्य नागरिकांना वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, बाबी जोगी, नीलम शिंदे, किरण वाळके, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, किसन मांजरेकर, राजा शंकरदास आदी व इतर उपस्थित होते.

4