गाबीत समाजाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

244
2
Google search engine
Google search engine
Google search engine

५३ रक्तदात्यांकडून रक्तदान…

मालवण, ता. ११ : क्रांतीदिनाचे औचित्य साधून तालुका गाबित समाज कार्यकारिणीने जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने भंडारी हायस्कूल सभागृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी भंडारी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया टिकम, मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, लायन्स क्लब अध्यक्ष उदय घाटवळ, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पी. एम. मोरे, समाजसेवक किशोर नांदगावकर, अधिपरिचाका एच. ए. रणदिवे, रक्तपेढी परिचर उल्हास राणे, नंदकुमार आडकर, गणेश मांजरेकर, बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर, नगरसेवक पंकज सादये, तुळशीदास गावकर, रामचंद्र पराडकर, वैदेही सारंग, रुपेश खोबरेकर, गाबित समाज तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्ष चारूशीला आचरेकर, सचिव महेंद्र पराडकर, खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य नरेश हुले, दादा वाघ, भाई कासवकर, संतोष ढोके, अरविंद मोंडकर, महेश जुवाटकर, गंगाराम आडकर, भाऊ मोरजे, दीक्षा ढोके, हरी खवणेकर, अन्वय प्रभू, जिल्हा सचिव राधीका कुबल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबा मोंडकर, पर्यटन व्यावसायिक राजन कुमठेकर, सीमाव फर्नांडिस आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी भंडारी हायस्कूलने मोफत हॉल उपलब्ध करून दिला.
रक्तदान करण्याच्या उद्देशाने अकरा महिलांनी आपली हजेरी लावली होती. त्यापैकी केवळ दोनच महिला रक्तदान करू शकल्या. अन्य महिलांच्या रक्तामध्ये रक्तदानासाठी अपेक्षित असलेली हिमोग्लोबीनची मात्रा न आढळल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. महिलांच्या आरोग्याविषयीच्या या समस्येबद्दल शिबिरात चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या विषयावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत भविष्यात कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान करणार्‍या यतीन मेतर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

\