घारपी-असनियेतील स्थलांतरानंतर:आरोग्य विभागाचे पथक गायब

2

 

एका महीलेची प्रकृती खालावली:ग्रामस्थांकडुन नाराजी व्यक्त

ओटवणे
स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांच्या बाबतीत आरोग्य विभागाच्या हेळसांड पणाचा धक्कादायक प्रकार समोर आला.असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या कणेवाडी येथील ग्रामस्थांपैकी एका महिलेची प्रकृती अचानक गंभीर बनली,मात्र आरोग्य विभागाचे पथकच गायब असल्याने संबंधित महिलेला खासगी वाहनाने रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.
असनिये-कणेवाडी येथील ग्रामस्थांचे असनिये प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.स्थलांतर केलेल्या ठिकाणी ग्रामस्थांसाठी आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी राहण्याचे आदेश आहेत.मात्र रविवारी आरोग्य विभागाचे कर्मचारीच गायब झाले आणि याचा फटका एका महिलेला बसला.स्थलांतरित ग्रामस्थांपैकी एका महिलेची प्रकृती अचानक गंभीर बनली.आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित नसल्याने, नेमके काय करावे,हेच ग्रामस्थांना समजेना.महिलेची प्रकृती गंभीर बनत चालल्याने तसेच परिसर निर्जनस्थळी असल्याने ग्रामस्थांसमोर पेचप्रसंग उभा राहिला.अखेर घटनास्थळी देवदूत बनून आलेल्या शिवसेना उपतालुका प्रमुख दीपक गावडे यांच्या वाहनातून सदर महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

2

4