महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची उद्या मालवणात बैठक…

2

खास. नारायण राणे, माजी खास. नीलेश राणेंची उपस्थिती…

मालवण, ता. ११ : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारणीची महत्वाची बैठक १३ ऑगस्टला दुपारी १२ वाजता येथील दैवज्ञ भवन सभागृहात होणार आहे
या बैठकीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, तालुका कार्यकारणी सदस्य तसेच आजी, माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केले आहे.

10

4