Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअसनियेसह पंचक्रोशीचा पर्यटन दृष्टया विकास...

असनियेसह पंचक्रोशीचा पर्यटन दृष्टया विकास…

 

राजन तेली:पुन्हा दरडी कोसळणार नाही यासाठी उपाययोजना करू

ओटवणे:
असनिये येथे भविष्यात पुन्हा दरड कोसळू नये,यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.तसेच सहयाद्री पट्ट्यातील असनियेसह लगतच्या गावांचा पर्यटन दृष्टया विकास करण्यासाठी प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन माजी आ.राजन तेली तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी असनिये येथे केले.
श्री.तेली यांनी दरडींमुळे स्थलांतरित केलेल्या कणेवाडी येथील ग्रामस्थांची रविवारी भेट घेतली.असनिये-घारपी मार्गावर पडलेल्या दरडीचा बराचसा भाग हटवून रस्ता तात्पुरता खुला करण्यात आला आहे.मात्र दरडीचे स्वरूप पाहता शिस्तबद्धपणे काम करणे गरजेचे आहे.भविष्यात पुन्हा येथे दरड कोसळू नये यासाठी सरंक्षक भिंत व इतर उपाययोजना करण्यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे,असे तेली म्हणाले.
असनिये पंचक्रोशी परिसर निसर्गसौंदर्य युक्त आहे.येथे विविध पर्यटन प्रकल्प सुरू होऊ शकतात. यासाठी लवकरच प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येईल तसेच येथील स्थलांतरित ग्रामस्थांसाठी विविध योजना सुरू केल्या जातील,असे आश्वासन श्री.तेली यांनी दिले.यावेळी जि. प.सदस्या सौ.श्वेता कोरगावकर, दादू कवीटकर,प्रथमेश तेली,कमल सावंत,दीपक गावडे,संजय सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments