सरगवे,पाल पुनर्वसन क्षेत्रासाठी नव्याने नळपाणी योजना करा…

211
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडासे-खुर्द सरपंचांची पालकमंत्री खासदारांकडे मागणी…

दोडामार्ग ता.१२: तिलारी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या आयनोडे, सरगवे व पाल या तीन गावासाठी स्वतंत्र पाणी योजना सुरू करण्यात यावी,अशी मागणी कुडासे-खुर्दच्या सरपंच सौ.संगीता देसाई यांनी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.
खासदार व पालकमंत्री दोडामार्ग दौऱ्यावर असताना सौ.देसाई यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत त्यांची भेट घेतली, व ही मागणी केली आहे.यात पाल व पुनर्वसन वसाहतीत गेले दहा दिवस पिण्याचे पाणी नाही.पाणीपुरवठा योजना बंद आहे.त्यामुळे परिसरातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सद्यस्थिती लक्षात घेता विहीर व पंपशेड पाण्याखाली गेली आहे.त्यामुळे भविष्यात असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी नव्याने योजना करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

\