कोकण पर्यटनाच्या विकासाबाबत उद्या मुंबईत विशेष बैठक…

2

पर्यटन मंत्र्यांची हजेरी: पायाभूत सुविधा व धोरणाबाबत होणार निर्णय…

कणकवली ता.१२: कोकणातील पर्यटन उद्योगासमोरील अडचणी आणि आव्हाने व त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी कोकण पर्यटन विकास विशेष बैठक मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:०० वाजता चर्चगेट मुंबई येथील सम्राट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार,प्रधान सचिव विनिता वेधसिंगल,समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव आदी उपस्थित राहणार आहेत.ही बैठक भाजपाचे माजी आमदार तथा कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास व पुढील दिशा ग्रामीण पर्यटन होमस्टे व पर्यटनासाठी प्रोत्साहनपर योजना,सहसी पर्यटन वॉटर स्पोर्ट्स,कृषी पर्यटन,निसर्ग पर्यटन व इतर नाविन्यपूर्ण पर्यटन यासंबंधी पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहे.यावेळी उद्योजक व पर्यटन प्रेमींनी उपस्थित दर्शवावी असे आवाहन श्री.जठार यांनी केले आहे.

4